उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलय. अशातच यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आहे. उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. नवी मुंबईल पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून मंगळवारी पहाटे पाच वाजता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आज कोर्टात नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. दरम्यान, गुलबर्गामध्ये आरोपी दाऊद शेख लपून बसला होता. यशश्रीच्या फोन कॉलवरील रेकॉर्डमुळे तपासाला वेग मिळाला. दरम्यान, गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून दाऊद शेखचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांना आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात यश आलं आहे.
खूनाच्या गुन्ह्यात अटक आरोपी दाऊद शेखवर आणखी एक ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. मयत मुलीला शिवीगाळ प्रकरणी आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे. दाऊद शेखने खुनाची कबुली दिली असून यावेळी त्याच्या सोबत कुणी दुसरा नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. पोलिसांच्या चौकशीत खुनाचे कारण स्पष्ट झाले असेल तरी आणखी काही बाबी समोर येण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते. प्रकरण अती संवेदनशील असल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे.