६ ऑगस्ट २०२४
शहर संघटक अॅड. नितीन पंडित, विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी, बाजीराव मते, मनविसेचे उपाध्यक्ष नितीन धानापुणे, रंजन पगारे, महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे, मीरा आवारे, शुभम चव्हाणके, वैभव शिंदे उपस्थित होते.
मनसेने याबाबत निवेदनही दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बस स्थानक, नाशिकरोडला गॅस पाईपलाईन, जलवाहिनी आदी कारणांसाठी रस्ते खोदले आहेत. त्यात आता पावसामुळे खड्ड्यात भर पडली आहे. वाहने चालविणे अवघड झाले असून अपघातही होत आहेत.
नाशिक रोड बस स्थानकात खड्ड्यांमधे पाण्याची तळी झालेली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने खड्ड्यांमध्ये 'होडी' सोडून आंदोलन केले. हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या व सर्वात जास्त महसूल मिळवून देणा-या नाशिकरोड बस स्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. बस स्थानकात प्रशासनाचे स्वतःचे स्वच्छतागृह, कँटीन, पाणी नाही.
कचराकुंडी नसल्याने स्थानकात कचरा साचला आहे. पावसाचे पाणी साचून डबके तयार झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जेल रोड व नाशिकरोड येथील मुख्य रस्ते व कॉलनी रस्ते यांची चाळण झाली आहे. लोकसभेच्या तोंडावर प्रशासनाने मुख्य रस्ते केले होते परंतु ते पावसामध्ये उखडले आहेत. शहरातील रस्ते निकृष्ठ दर्जाचे तयार होत असल्याने खड्डे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत का? असा प्रश्न मनसेने विचारला आहे. प्रशासनाने समस्या दूर न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा मनेसेने दिला आहे.
Copyright ©2025 Bhramar