सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगत ग्रामसेवकाकडे मागितली 5 लाखांची खंडणी
सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगत ग्रामसेवकाकडे मागितली 5 लाखांची खंडणी
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ग्रामसेवकाला भ्रष्टाचाराच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसेवक प्रविण सिद्धार्थ पठारे (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 4 ते 19 सप्टेंबर 2024 दरम्यान देवीदास बैरागी या इसमाने पठारे यांना त्यांच्या कार्यकाळातील कारभाराबद्दल भ्रष्टाचाराच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. तसेच मी सीबीआयचा गोपनिय ऑफिसर असल्याची बतावणी करुन व्हॉट्स अ‍ॅप कॉलच्या माध्यमातून बैरागी याने 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. दि. 9 सप्टेंबर रोजी बैरागी याने पठारे यांचे मित्र थोरे यांना कॉल करून निफाड बसस्थानक येथे भेटायला बोलावले होते.

मला 5 लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या बातम्या लागतच राहातील, असे त्याने थोरे यांना सांगितल्याचे पठारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच मी सीबीआयचा गोपनिय ऑफिसर आहे. मी जर मागे लागलो तर 20-22 दिवसांत तुमचा निकाल लावून टाकेल, असा दम बैरागीने पठारे यांना दिला.

त्याच्या या त्रासाला कंटाळून पठारे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात बैरागी विरुद्ध फिर्याद दिली. हा गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने तो निफाड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नाईकवाडे करीत आहे. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group