दगडाने ठेचून पत्नीची हत्या; आठवड्यातील दुसऱ्या खूनाने नांदगाव तालुका हादरला
दगडाने ठेचून पत्नीची हत्या; आठवड्यातील दुसऱ्या खूनाने नांदगाव तालुका हादरला
img
दैनिक भ्रमर


मनमाड (सौ. नैवेद्या बिदरी) :- गेल्या सहाच दिवसापूर्वीच नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात एका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने आपल्याच नवऱ्याचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा न्यायडोंगरी गावात दुसरा खूनाचा गुन्हा दाखल झाल्याने न्यायडोंगरीसह नांदगाव तालुका हादरून गेला आहे.

मयत डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे (वय 27, रा. न्यायडोंगरी) हीचा दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जिवे ठार मारले अशी फिर्याद मयत डॉक्टर भाग्यश्री शेवाळेचा भाऊ सचिन कैलास साळुंखे  (रा. तितरखेडा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजी नगर हल्ली मुक्काम रॉयल लॉन्स च्या बाजूला वाळुंज तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर) यांनी दिली आहे.  
   
त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या ५ ऑक्टोबर रोजी न्यायडोंगरी गावात एका पत्नीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या सहाय्याने नवऱ्याला ठार केले तर आजच्या या गुन्ह्यात डॉक्टर नवऱ्याने त्याच्या बापाच्या सहाय्याने डॉक्टर असलेली पत्नी भाग्यश्री हिला दगडाने ठेचून ठार मारले आहे. 

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, गेल्या २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकराचे दरम्यान मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून डॉक्टर भाग्यश्री ही मयत झाल्याचे सांगून चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदरचे घटनास्थळ नांदगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा ०० नंबरने नांदगाव येथे वर्ग करण्यात आला होता.

परंतु काल तब्बल १५ दिवसानंतर मयत डॉक्टर भाग्यश्री हिचा भाऊ सचिन कैलास साळुंखे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझी बहीण भाग्यश्री हिच्याकडे पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व तिचे सासरे नंदू राघो शेवाळे हे नेहमी तू तुझ्या माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन ये अशी मागणी वेळोवेळी करीत होते. परंतु सदरची मागणी भाग्यश्री हिच्याकडून पूर्ण न झाल्याने पंचवीस लाखा रुपयांसाठी पती व सासरे यांनी संगनमताने व फिर्यादीची बहीण डॉक्टर भाग्यश्री हिस दगडाने ठेचून व काचेची बाटली मारून जीवे ठार मारल्याचा आरोप केला आहे.
   
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक नितीन खंडागळे, मनोज वाघमारे, संतोष बहाकर हे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group