रुई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांची काढली अंत्ययात्रा
रुई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांची काढली अंत्ययात्रा
img
दैनिक भ्रमर

लासलगाव (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील रुई येथे सकल मराठा समाजाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते  यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा  काढून  निषेध करण्यात आला.

मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज बांधव आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी लाखांचे मोर्चे, आंदोलन केले. परंतु, राज्य सरकारने याची ना दाद, ना फिर्याद घेतली. अखेर मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू करून आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आहे. परंतु, उपोषणामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.

असे असतानाही राज्य सरकार ठोस भूमिका घेऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यास चालढकल करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये सरकार व राजकीय पुढाऱ्यांविरोधात तीव्र लाट उसळली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी निफाड तालुक्यातील रुई येथील ग्रामस्थांनी अंतयात्रा काढली.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
इतर बातम्या
Join Whatsapp Group