नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड- जेलरोड शिवजन्मोत्सव समितीचे सभासद म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी पोलीस आयुक्त कर्णिक यांना सन्मानपूर्वक सभासद पावती दिली.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने नाशिकरोड पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांनी पोलीस आयुक्त कर्णिक यांना समितीच्या सभासद होण्याची इच्छा व्यक्त केली.
पोलीस आयुक्त कर्णिक यांनी तात्काळ या प्रस्तावाला मान्यता दिली आणि समितीच्या सभासद शुल्क देणगी म्हणून दिले. यामुळे ते नाशिकरोड-जेलरोड शिवजन्मोत्सव समितीचे सभासद म्हणून अधिकृतपणे सामील झाले.
शांतता समितीच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला भेट दिली आणि मार्गदर्शक सूचना केल्या.
यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष योगेश गाडेकर, कार्याध्यक्ष सुनील सोनवणे,प्रशांत कळमकर,राहुल लवटे, गोकुळ नागरे, विशाल सातभाई, माजी अध्यक्ष बंटी भागवत, किशोर जाचक, राजू फोकणे, माजी नगरसेवक विशाल संगमनेरे, विक्रम कोठुळे, संयोजक नितीन चिडे, योगेश भोर, साहेबराव शिंदे, संतोष क्षीरसागर, दर्शन सोनवणे, शंतनु निसाळ, विजय जाधव पाटील, श्याम गोहाड, राहुल ताजनपुरे, तुषार फडोळ, कैलास मालुंजकर, सचिन कोठुळे यांनी पोलीस अधिकार्यांना शिवजन्मोत्सव संदर्भातील कार्यक्रमाची माहिती दिली. यावर पोलीस आयुक्त कर्णिक यांनी समाधान व्यक्त केले.
नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीचा हा निर्णय समाजातील एकात्मता, शांतता आणि उत्सवाची योग्य पद्धतीने तयारी करण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरला आहे. या समितीच्या पुढाकारामुळे नाशिक शहरातील शिवजन्मोत्सवाचे आयोजन अधिक गती घेईल आणि त्याचे आयोजन सफल होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.