नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- सध्या नाशिकरोड जेलरोड मधून शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असताना एक माजी नगरसेवक ठाकरे गटात जाण्याची शक्यता असल्याचे समजते.
नाशिकरोड जेलरोड मधून शिवसेना शिंदे गटात अनेक माजी नगरसेवक प्रवेश करीत आहे. आज संध्याकाळी नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांसह जेलरोड येथील माजी नगरसेविका रंजना बोराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट,शिवसेना ठाकरे गट यांच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर नेते नजर ठेवून आहेत. असे असताना जेलरोड येथील एक माजी नगरसेवक शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे संकेत शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून समजते.