पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या 12 साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता ड्रग्ज माफिया ललित पाटिलला तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. ललित पाटीलला सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता.
आता पुन्हा एकदा ड्रगमाफिया ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललितनं सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले. आतापर्यंत आठ किलो सोने जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोने विकत घेतले होते. गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटील ला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले.
ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. याशिवाय पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.