अल्पवयीन असतानाच लावले मुलीचे लग्न ; बाळंतपणानंतर लक्षात येताच पाच जणांवर गुन्हा दाखल
अल्पवयीन असतानाच लावले मुलीचे लग्न ; बाळंतपणानंतर लक्षात येताच पाच जणांवर गुन्हा दाखल
img
DB
नाशिक (प्रतिनिधी) :- मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचे लग्न लावून देत तिच्याशी संबंध प्रस्थापित करून तिला बाळाला जन्म देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांसह सासरच्या पाच जणांविरुद्ध अत्याचार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित फिर्यादी ही सातपूर परिसरात राहते. दरम्यान, पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही पीडितेची आई मुक्ता केदू साठे, वडील केदू अशोक साठे, उषा पुंडलिक बकरे, पुंडलिक रामचंद्र बकरे व किरण पुंडलिक बकरे (सर्व रा. कोऱ्हाटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) या सर्वांनी संगनमत करून तिचा विवाह दि. 9 जुलै 2022 रोजी कोऱ्हाटे येथे लावून दिला. त्यानंतर सासरी गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यातून ही मुलगी गर्भवती झाली व त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला.

ही बाब उघड झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पाच जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अधिनियम, तसेच बालप्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group