नाशिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक पूणे महामार्गवरील दत्त मंदिर जवळील गुरुद्वारा मागील एका बंगल्या बाहेर असलेल्या वॉचमन व घर कामगार यांच्या घराला संध्याकाळी भीषण आग लागली. आगीत जीवितहानी टळली.
दत्त मंदिर जवळील गुरुद्वारा मागील बिटको इंग्लिश मिडीयम शाळे समोरील नरेंद्र बिंद्रा यांचा "अमृत व्हिला" हा बंगला आहे. या बंगल्याच्या भिंती लगत घरकाम करणारे कामगार व इमारतीचे वॉचमन विलास विश्वनाथ निकम यांना पत्र्याचे घर तयार करुन दिले आहे.
आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने लाईट बंद होऊन वायरी जळू लागल्याने घरातील सर्व बाहेर पळून गेले आणि अचानक घरात आग लागली. आरडाओरड केल्याने काही नागरिकांनी नाशिकरोड अग्निशमक दलाला कळवले.अग्निशमक दलाचे मनोज साळवे, रामदास काळे, प्रथमेश पुरी, किशोर तोरमड यांनी घटनास्थळी धाव घेऊन एका बंब च्या सहाय्याने आग विझवली.
या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी घरातील कपडे, अंथरून, आदी सह गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाले.