येवल्याच्या प्रवेशद्वारावरील भव्य आकाश कंदीलाने वेधले लक्ष
येवल्याच्या प्रवेशद्वारावरील भव्य आकाश कंदीलाने वेधले लक्ष
img
दैनिक भ्रमर
येवला (दीपक सोनवणे) :- येवल्यातील समाजकार्यात अग्रेसर असणारे श्री फत्तेसिंग सेवाभावी संस्था फत्तेबुरुज नाका येथील युवकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दहा फुटाचा भव्य डिजिटल आकाश कंदील लावला असून तो आकाश  कंदील आता  सर्वांचे लक्ष वेधत आहे.

शहरातील फत्तेबुरुज नाका येथे श्री फत्तेसिंग बाबा मंदिर असून याच नावाने या ठिकाणी श्री फत्तेसिंग सेवाभावी संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे

ही संस्था विविध समाजकार्य, धार्मिककार्य करीत असते. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील येथील युवकांनी दहा फुटाचा डिजिटल आकाश  कंदील लावलेला आहे,  

या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी दीपक सोनवणे, बापू बहिरट, विशाल भांडगे, भैय्या मढे, दुर्गादास भालेराव, नंदू संत, संदेश वाघ, सचिन वखारे, तसेच कालिदास अनावडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते
इतर बातम्या
Join Whatsapp Group