गणेशोत्सवापूर्वी मोठी बातमी! हायकोर्टाने POP मूर्ती संदर्भात दिला
गणेशोत्सवापूर्वी मोठी बातमी! हायकोर्टाने POP मूर्ती संदर्भात दिला "हा" मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक  निर्णय दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस  पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींवरील बंदी हटवण्यात आली असून, या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील मूर्तिकार, व्यापारी आणि गणेश मंडळांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार, आता POP मूर्तींची निर्मिती आणि विक्री कायदेशीररित्या परवान्याने होऊ शकते. मात्र या मूर्तींचे विसर्जन हे फक्त कृत्रिम जलस्रोतांमध्येच केले जाईल, नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये नव्हे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे.

मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की, तीन आठवड्यांच्या आत एक तज्ज्ञ समिती स्थापन करून विसर्जन प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांची माहिती सादर करावी. या समितीच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावांची निर्मिती, पीओपीचे साठवण आणि पुनर्वापर यासाठी उपाययोजना केल्या जातील.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group