
८ डिसेम्बर २०२३
वैद्यकीय कारणावरुन जामिनावर असेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक हे अजित अजित पवार गटात सामिल झाले. सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. यावेळी नवाब मलिक कोणत्या गटात सामिल होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं.
सभागृहात नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनने जाऊन बसल्यावर ते अजित पवार गटात सामिल झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे नवाब मलिक यांच्यावर आरोप केल्या भाजपची मात्र चांगलीच पंचाईत झाली. भाजपनेच देशद्रोहासारखे आरोप केलेले नवाब मलिक भाजप प्रणिसत सरकारच्या बाजूला जाऊन बसल्याने भापवर टीका होऊ लागली. यावरुन उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.
सत्ता येते सत्ता जाते, पण देश महत्वाचा आहे. त्यांना देशद्रोहाचा आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे नवाब मलिक यांना महायुतीत सामवून घेता कामा नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर अल्याने, राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.
Copyright ©2025 Bhramar