गडकरी चौकात स्कूल व्हॅनच्या धडकेत वृद्ध जखमी
गडकरी चौकात स्कूल व्हॅनच्या धडकेत वृद्ध जखमी
img
Dipali Ghadwaje

नाशिक (प्रतिनिधी) :- रस्ता ओलांडणारे वृद्ध भरधाव स्कूल व्हॅनच्या धडकेने जखमी झाल्याची घटना गडकरी सिग्नलजवळ घडली.

याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी जाकीर हुसेन शेख जैनोद्दीन (वय 44, रा. सादिकनगर, वडाळा गाव, नाशिक) हा त्याच्या ताब्यातील स्कूल व्हॅन भरधाव वेगाने घेऊन जात होता.

दरम्यान, गडकरी सिग्नलकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या रोडने आनंद रामलाल जोशी (वय 73, रा. रत्नप्रभा सोसायटी, तिडके कॉलनी, नाशिक) हे रस्ता ओलांडत असताना जाकीर जैनोद्दीन याने भरधाव स्कूल व्हॅन चालवून त्यांना धडक दिली. त्यात त्यांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालक जाकीर जैनोद्दीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group