शिवसेना (उबाठा) गटाला विहितगाव येथे मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
शिवसेना (उबाठा) गटाला विहितगाव येथे मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
img
Chandrakant Barve



नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शिवसेना (उबाठा) गटाला नाशिकरोड येथील विहीतगाव परिसरात मोठा धक्का बसला असून या गटातील तसेच इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला आहे.



मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी युवा नेते विक्रम कोठुळे, माजी नगरसेवक जगदीश पवार, व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जुल आदी  उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख संजय वाळू कोठुळे, प्रभाग क्रमांक २२ चे शाखा प्रमुख आत्माराम विठ्ठल आढाव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे नाशिक तालुका उपाध्यक्ष रोहित गणेश मते, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोज ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख समाधान कोठुळे, विभाग प्रमुख संतोष कोठुळे तसेच शिवसैनिक सचिन भांगरे आणि धीरज बोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून पक्षाच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला.

या प्रवेशामुळे नाशिकरोड परिसरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून शिवसेना (उबाठा) नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी “उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वातच खऱ्या अर्थाने विकास साध्य होईल,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे यांनी व्यक्त केला.

आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश उद्धव ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नाशिकरोडमध्ये आपल्या संघटनेला नवचैतन्य देत राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group