सातपूर - परिसरातील केबल पार्क येथे हिंदुस्तान बेकरी समोर आज दुपारच्या सुमारास महावितरण कर्मचारी इलेक्ट्रिक पोलवर काम करताना जखमी झाल्याची घटना घडली
सत्व परिसरातील केबल पार्क येथे महावितरण कर्मचारी संदीप शार्दुल हे आपल्या सहकाऱ्यासह इलेक्ट्रिक पोलावर दुरुस्तीचे काम करीत होते. याच दरम्यान अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोराचा शॉक बसला.
या अपघातात संदीप शार्दुल यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना पोलावरून खाली उतरवून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेमुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. काही वेळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.