वेगवेगळ्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करणाऱ्या उपनगर गुन्हे शोध पथकाचा पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी केला गौरव
वेगवेगळ्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करणाऱ्या उपनगर गुन्हे शोध पथकाचा पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी केला गौरव
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- गुन्हा घडल्या नंतर तत्काळ तपासाची गती फिरवणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पाठीवर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी कैतुकाची थाप मारली आणि त्यांची काम करण्याची उमेद वाढवली. या वेळी जेष्ठ कवीवर्य कुसमाग्रज यांची "पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा.. याची आठवण झाली.
   
उपनगर पोलीस ठाण्याची व्याप्ती तशी खूप मोठी. अनेक झोपडपट्टी, विखूरलेले मळे भाग, सदन लोकांची वस्ती असे अनेक किलोमीटर लांब भाग आहे. त्यात करंसी नोट प्रेस, विद्युत भवन व मुख्य म्हणजे आर्टीलरी  सेंटर चा मुख्य भाग आहे. त्यामुळे गुन्हे घडण्याची प्रमाण तसे इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेत बरोबरी असले तरी काही तासात त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचण्याचे काम उपनगर पोलिसातील गुन्हे शोध पथक मात्र तात्काळ करीत असते, आणि त्यावेळी मात्र "कानून के हाथ बोहत लंबे होते हे "हा चित्रपटातील डॉयलॉग ची आठवण होते.

मागील काही महिण्यापुर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहितगांव येथे चारचाकी, दुचाकी गाड्याची तोडफोड केल्या तर अनेक गाड्यावर पट्रोल ओतून पेटवून दिल्या.ती रात्र जाते नाही तर धोंगडे मळा येथील चार ते पाच चारचाकी गाड्याची तोडफोड करण्यात आली. यात एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या गाडीचा समावेश होता.

या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली होती. या पाठोपाठ नाशिक पूणे महामार्गांवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अज्ञात युवकांनी एका युवकांची हत्या केली. साधारण आठ दिवसात एक दिवस आड घटना घडल्याने पोलीस यंत्रणा हादरली मात्र गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष टीम बरोबर सतत आठ दिवस झोप न घेता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना शोधून काढून त्यांना गजाआड केले. याच काळात मोक्का मध्ये असलेल्या एका सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळी चा खात्मा करून त्याना बेड्या ठोकत खडी फोडायला पाठवले.

 मागील आठवड्यात विहितगांव येथील एका तेल व्यापारी कडे वसुली चे काम करणाऱ्या कामगारला अडवून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या जवळील सुमारे पाऊणे दोन लाख रोख तर तीन लाख रुपयेचे धनादेश घेऊन पोबारा केला होता. घटना रात्रीची व कुठलाही पुरावा नसताना अवघ्या दोन दिवसात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व टीम यांनी त्याचा तपास लावत तीन युवकांसह गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी हस्तगत केली.

हे मोठे गुन्ह्यात व्यस्त न राहता याच गुन्हे शोध पथकाने आनंद नगर येथील एका खाजगी क्लाससाठी जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या चार ते पाच सायकली चोरी झाल्या.मुलं रडू लागली.पोलीस ठाण्यात खबर दिल्या नंतर काही तासात या पथकानी सायकल चोराचा व चोरी गेलेल्या सायकलचा छडा लावून रडू असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणले.अनेक मुलांना सायकली वाटप केल्या.

या कर्त्याव्यदक्ष पथकात पोलीस हवालदार विनोद लखन,सोमनाथ  गुंड, अनिल  शिंदे,जयंत  शिंदे,पंकज कर्पे, सुरज गवळी,सौरभ लोंढे,संदेश  रघतवान, राहुल  जगताप यांनी काम केले.
यांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक यांचे कैतुक करून त्याना प्रमाणपत्र देत त्याच्या पाठीवर प्रामाणिक कार्यची थाप दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group