मुंबई : मुंबई महानगरपालिकेसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, या माहितीमुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, ही बातमी आहे पालिकेच्या मुदत ठेवींची अर्थात FD संदर्भातली. 31 मार्च 2022 रोजी मुदत ठेवींची रक्कम ही 91 हजार 690 कोटी रुपये होती. जून 2023 रोजी FD 86467 कोटी रुपये इतक्या होत्या. नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत त्या 84615 कोटी रुपयांवर आल्या आणि तिथंच या ठेवींमध्ये झपाट्याने घट होत असल्याची बाब समोर आली.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँकांमध्ये ठेवी असून त्याची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत बँकेतील मुदतठेवींच्या ताळेबंदमध्ये नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 84615 कोटी रुपयांचा निधी असल्याचे नमुद केले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये अर्थसंकल्प अ, ई आणि ग या बाबतीतील मुदतठेवीतील आरंभीची एकूण गुंतवणूक 85370 कोटी एवढी होती. सदर रकमेतून 7489 कोटी रकमेच्या एफडी मॅच्युअर्ड झाल्या आहेत.
त्यामुळे अर्थसंकल्प अ, ई आणि ग ची नोव्हेंबर 2023 मध्ये गुंतवण्यात आलेल्या आलेल्या एकूण रक्कम 6734 कोटी वजा मॅच्युअर्ड मुदतठेवी 7 हजार 489 कोटी या प्रमाणे नोव्हेंबर 2023 मधील निव्वळ गुंतवणूक 755.03 कोटी इकती आहे. थोडक्यात 30 नोव्हेबंर 2023 रोजी मुदत ठेवीतील अखेरची गुंतवणूक 84615 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये 366 ते 558 दिवसांकरीता विविध बँकामध्ये ही गुंतवणूक केली असून त्यावर 7.60 ते 7.68 टक्के दराने 578 कोटी रुपये व्याज मिळणार आहे. 31 मार्च 2022 रोजी मुदत ठेवींची रक्कम ही 91690 कोटी रुपये होती. जून 2023 रोजी मुदतठेवींचा आकडा 86467 कोटी रुपयांवर आला.
त्यानंतर नोव्हेंबर 2023 च्या अखेरपर्यंत तो 84615 कोटींवर आला आणि ठेवींमध्ये झपाट्याने घट होत असल्याचं लक्षात आलं आणि ही रक्कम नेमकी कशी घटली हाच प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.