शरद पवार गटाचे नाव ठरले; निवडणूक आयोगाने दिले
शरद पवार गटाचे नाव ठरले; निवडणूक आयोगाने दिले "हे" नाव
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळालं आहे.

शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव दिलं आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' हे नाव त्यांना दिलं आहे. 

शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group