राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार
- शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
- बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
- ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
- रायगड - अनंत गीते
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
- वायव्य मुंबई - अमोल कीर्तीकर
- संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
- धाराशिव - ओमराजे निंबाळकर
- परभणी - संजय जाधव
- ठाणे - राजन विचारे
आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून 11 जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.