अरे व्वा! मोदींची लोकप्रियता पुन्हा वाढली! 2023 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली अप्रूवल रेटिंग
अरे व्वा! मोदींची लोकप्रियता पुन्हा वाढली! 2023 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढली अप्रूवल रेटिंग
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरात ओळखले जाऊ लागलेले नेते ठरत आहे. ते जागतिक नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. शिवाय, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान अप्रूवल रेटिंग सर्वे करणाऱ्या एका संस्थेने यावर शिक्कोमोर्तबतच केले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रूवल रेटिंमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ७५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळवली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२३ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. त्यात आता १० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ निवडणुका जवळ आल्या असताना लोकांचा कल मोदींच्याच बाजूने असल्याचं चित्र आहे.

२०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांना ६० टक्के अप्रूवल रेटिंग होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांना ६७ टक्के अप्रूवल रेटिंग मिळाली होती. म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना दिवसेंदिवस मान्यता वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या अप्रूवल रेटिंगमध्ये २ टक्क्यांनी घट झाली होती. पण, त्यांनी पुन्हा एकदा मोठी मजल मारली आहे. २०२४ मध्ये त्यांनी अप्रूवल रेटिंग वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात अनेक महत्त्वाच्या घटना देशात घडल्या आहेत. भारतात जी-२० परिषद आयोजित करण्यात आली होती. देश अंतराळ क्षेत्रात मोठी मजल मारत आहे. जगातील प्रमुख देशांसोबत भारताने महत्त्वाचे करार केले आहेत. शिवाय, अनेक देशांसोबत भारताचे संबंध सुधारले आहेत.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये हिंदू मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. मेक इन इंडियाला चालना मिळत आहे अशा काही गोष्टी मोदींच्या पथ्यावर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांची अप्रूवल रेटिंग वाढली आहे. राम मंदिराच्या निर्माणामुळे प्रामुख्याने उत्तर भारतात मोदींची लोकप्रियता वाढली आहे.

कोणत्या वर्गाने मोदींना किती रेटिंग दिलीये

४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्ती- ७९ टक्के
१८ ते ३० वयोगटातील व्यक्ती -७५ टक्के
३१ ते ४५ वयोगटातील व्यक्ती -७१ टक्के

महिला- ७५ टक्के
पुरुष- ७४ टक्के

कोणत्या क्षेत्रात किती रेटिंग
प्रदूषण आणि पर्यावरण - ५६ टक्के
गरीबी निर्मूलन- ४५ टक्के
चलनवाढ रोखणे- ४४ टक्के
बेरोजदारी दूर करणे- ४३ टक्के
भ्रष्टाचार संपवणे- ४२ टक्के

कोणत्या भागात किती रेटिंग
उत्तर भारत- ९२ टक्के
पूर्व भारत- ८४ टक्के
पश्चिमी भारत-८० टक्के
दक्षिण भारत -३५ टक्के

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group