चिंचा तोडणे युवकाला पडले महागात; झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू
चिंचा तोडणे युवकाला पडले महागात; झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी) :- झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

वडाळा-पाथर्डी भागातील शिवाजीवाडी येथील युवक भाऊराव रघु कुवर (वय 20) हा दादाभाऊनगर, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिकरोड येथील भास्कर लोखंडे यांच्या मळ्यात चिंचेच्या झाडावर चिंचा तोडण्यासाठी गेला असता खाली पडल्याने त्याला उपचारार्थ बिटको हॉस्पिटल, नाशिकरोड येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी उपनगर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, दसक पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group