गाडी चोरट्यांना दहा गाड्यांसह घेतले शेजार च्या जिल्ह्यातुन ताब्यात; उपनगर पोलिसांची कारवाई
गाडी चोरट्यांना दहा गाड्यांसह घेतले शेजार च्या जिल्ह्यातुन ताब्यात; उपनगर पोलिसांची कारवाई
img
Dipali Ghadwaje
नाशिकरोड (प्रतिनिधी):-उपनगर व शहरातील इतर भागातून गाड्या चोरून शेजारच्या जिल्ह्यात घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या चोरांना उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने साडे सहा लाखाच्या दहा गाड्यासह ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पेंढारकर कॉलनी, महाजन हॉस्पिटल मागे, जेलरोड येथून ऍक्टिव्हा दुचाकी चोरी गेल्या बाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी व पथक तपास करीत असतांना सीसीटीव्ही कॅमेरेच्या व तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेत पथकांनी शेजरील जळगाव जिल्ह्यातुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने अजय शंकर चव्हाण (वय29) व उत्तम प्रेमा पवार (वय29)राहणार एम आय डी सी, जळगाव यांना ताब्यात घेतले.त्याना विश्वासात घेऊन त्याच्या कडून सुमारे साडे सहा लाख किंमतीच्या दहा मोटारसायकल, ऍक्टिव्हा ताब्यात हस्तगत करण्यात आले.

या कामगिरीत सपोनि चौधरी सह पोलिस हवालदार विनोद लखन,सोमनाथ गुंड, पंकज कर्पे,गौरव गवळी, अनिल शिंदे,जयंत शिंदे, राहुल जगताप,सुरज गवळी, सौरभ लोंढे,संदेश रघतवान आदी सहभाग घेतला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, साहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे,पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांनी पथकाचे कामगिरीचे कौतुक केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group