उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर बबन घोलप यांचा गौप्यस्फोट; म्हणाले...
उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर बबन घोलप यांचा गौप्यस्फोट; म्हणाले...
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (प्रतिनिधी):-माझ्या मुळे छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश रोखला गेला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते माजी मंत्री बबन घोलप यांनी केला. शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

एक वर्षा पूर्वी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मला छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करीत असल्याबाबत सांगितले. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भुजबळ यांना प्रवेश देऊ नका, भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वर गुन्हे दाखल करून कोर्टात खेचले आहे.

सह माझ्या अनेक शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून त्याचे राजकीय भविष्य धोक्यात आणले आहे. जर भुजबळ यांना पक्षात घेतले तर आम्ही कुठे जायचे? असे सांगितल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे दार भुजबळ यांच्या करीता बंद केल्याचे घोलप म्हणाले.
मी ५५वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करतो,अहमदनगर, संभाजी नगर या जिल्ह्यात प्रथम शिवसेनेची मी शाखा उघडल्या.

उत्तर महाराष्ट्रात मोटरसायकल वर फिरून शिवसेना वाढवली आहे.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे बाळकडू आम्ही घेतले असून मी शिवसेना सोडणार नाही, हवं तर त्यांनी आम्हाला पक्षाच्या बाहेर काढावे असेही घोलप म्हणाले.

 याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेटी साठी बोलावले असून त्याच्या बरोबर भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करू असेही शेवटी घोलप म्हणाले.

बबन घोलप पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले पहाइतर बातम्या
Join Whatsapp Group