मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर टोल वाढ; नवे दर किती आणि कधीपासून लागू होणार?
मुंबईच्या वेशीवरील पाच नाक्यांवर टोल वाढ; नवे दर किती आणि कधीपासून लागू होणार?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ केली जाणार आहे. मुंबईत प्रवेश करण्याआधी लागणाऱ्या ५ टोलनाक्यावरील टोल वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या १ ऑक्टोबरपासून कारसाठी पाच रुपये तर मिनीबस १० रुपये, ट्रक आणि बससाठी २० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २७ सप्टेंबर २००२ च्या अधिसूचनेत दर तीन वर्षांनी टोल दरवाढीसंदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यानुसार ही टोल दरवाढ केली जाणार आहे.

वाशी, मुलुंड एलबीएस, मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली या पाच टोल नाक्यांवरील शुल्क 1 ऑक्टोबरपासून वाढणार आहे. टोलमधील ही वाढ साधारणपणे दर तीन वर्षांनी होत असते. यापूर्वी टोल क्षुल्कात वाढ २०२० मध्ये वाढ झाली होती. 
 
टोलवाढ झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी ४० रुपये लागणार आहे. याआधी हा टोल 35 रुपये होता. ट्रक आणि मिनी बससाठी १०५ रुपयांवरून १३० रुपये तर जड वाहनांकडून १३५ रुपयांवरून १६० रुपये टोल आकारला जाणार आहे. हे दर २०२६ पर्यंत लागू असतील. 

टोल चालकांना वसुलीचे कंत्राट दिले तेव्हाच दर तीन वर्षांनी दरवाढ करण्याची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोल दरवाढ केली जात आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजीही याच पद्धतीने टोल दरवाढ केली जाणार असून, २०२७ पर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे.

मनसे आक्रमक 
दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष आक्रमक झालेले आहेत. त्यात आता मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील टोलवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. टोलवाढीच्या निर्णयानंतर मनसेने सरकारवर टीका केली आहे. मनसेने ट्वीट करत म्हटलं की, आधीच ठाणेकर ४ टोल भरतात, त्यात येत्या १ ऑक्टोबरपासून सरकार टोलवाढ करणार आहे. हीच टोलधाड रोखण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव, सत्यवान दळवी, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे निवेदन द्यायला गेले असता त्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं. बाप्पा बुद्धी दे रे ह्या निर्बुद्ध सरकारला, असं ट्वीट मनसेने केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group