कुर्ला परिसरात इमारतीला भीषण आग! ६० जणांची सुखरुप सुटका; 'इतके' जण रुग्णालयात दाखल
कुर्ला परिसरात इमारतीला भीषण आग! ६० जणांची सुखरुप सुटका; 'इतके' जण रुग्णालयात दाखल
img
DB
मुंबईमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मुंंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमनल दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालय परिसरात डॉ भीमराव रावजी आंबेडकर ही गृहनिर्माण इमारत असून शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. इमारतीला आग लागताच रहिवाशांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. 

यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी ईमारतीत अडकले होते. विनोबा भावे नगर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ व्या मजल्यापर्यंत जाऊन इमारतीत अडकलेल्या ३० ते ३५ जणांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. 

मात्र धुरामुळे घुसमटल्याने ३९ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार जणांना कोहिनुर रुग्णालयात आणि इतर ३५ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील चौघांना घरी सोडण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून व्ही. बी. नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत

इतर बातम्या
Join Whatsapp Group