ब्रेन ट्रेनतर्फे 61 गुरुजनांचा सत्कार
ब्रेन ट्रेनतर्फे 61 गुरुजनांचा सत्कार
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक मॅथ ॲण्ड अबॅकस यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकदिनाच्या सन्मानार्थ 61 गुरूंचा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिला सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत मोफत अबॅकस शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 45 शिक्षक व शिक्षिकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरच्या बाळ भगवान शिक्षण संस्थेच्या संचालिका कोमल साळुंखे-ढोबळे, नाशिकच्या ग्लोबल व्हिजन स्कूलच्या संस्थापक विजयालक्ष्मी वैरागकर -मणेरीकर, राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पाटील, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील, चाकणच्या महिंद्रा प्रकल्पाचे जनरल मॅनेजर प्रशांत हरकरे जेम्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका हिमगौरी आडके, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या जनसंपर्क संचालिका डॉ. अश्विनी बोरस्ते, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष रंगनाथ शिरसाठ, ब्रेन ट्रेन फाऊंडेशनचे विधी सल्लागार ॲड. भाऊसाहेब गंभीरे,  महिंद्रा एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय घोडके हे उपस्थित होते, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा नंदिनी निकम, मानद सदस्य नरेंद्र निकुंभ व रूपाली फुले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी मोरे व दामिनी नीलकंठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

पुरस्कारार्थी विजेत्यांमध्ये इंजि. अपूर्वा जाखडी, (स्पेस एज्युकेटर, नाशिक), भूषण कुलकर्णी (नॉलेज ब्रिज डिजिटल टीचिंग सोल्युशन, अहमदनगर), अभिजित दळवी (आर्चरी, आंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रशिक्षक, अहमदनगर), प्रा. ईश्वर क्षीरसागर (मुख्याध्यापक, संत गाडगेबाबा आश्रम शाळा, मंगरूळ, उस्मानाबाद), डॉ. अनुराधा हरकरे (मानसशास्त्र अध्यापक, पुणे), डॉ. सारिका पी. पाटील, प्रा. कारभारी म्हस्के, प्रा. ज्ञानेश्वर म्हस्के (संचालक, ज्ञानगंगा क्लासेस- नाशिक), अश्विनी पाटील (संस्थापक : अश्वमेध पब्लिक स्कूल, टाकळी), अर्चना मारगोंनवर (नन्ही कली प्रकल्प, मुख्य समन्वयक, नाशिक),  रूपेश नेरकर (संडे सायन्स स्कूल), रवींद्र पाटील (प्लम्बिंग असोसिएशन- नाशिक), डॉ. गजानन आंभोरे, (संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार), वाल्मीक चव्हाण (जिल्हा परिषद शिक्षक, गणित मित्र या संकल्पनेतून कार्य), डॉ. लीना महाजन, संगीता पवार (मुख्याध्यापिका, कुसुमाग्रज प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर नाशिक), अनुपमा दाभाडे, (प्राथमिक शिक्षिका, सातारा), अशोक निकाळजे (जि. प. प्राथमिक शिक्षक, आगर, जि. बीड), शीतल कारवाळ, (उपशिक्षिका, मनपा, नाशिक),

तसेच प्रा. उषा गायकर, (के. के. वाघ महाविद्यालय, पिंपळस निफाड), सज्जाद हैदर खान (सदस्य, ऊर्दू अभ्यास गट), दीपक हिरे (सूत्रसंचालन व कविता लेखन), प्रा. सुनीता बावणे (साई कोचिंग क्लासेस), सोमनाथ उबाळे (उबाळे कोचिंग क्लासेस) सुभाष सोनवणे, (डीपी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव, सुरगाणा), स्नेहल फिस्के, सुनयना अहिरे, अरुणा पाटील (देसले), (ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अंबड) अश्विनकुमार कस्तुरे,  शिक्षण विभाग, डॉ. सीए देवेंद्र दगडे, संदीप सरोदे, (चांडक कन्या विद्यालय, सिन्नर), प्रो. भूषण देशमुख, ज्ञानेश्वर कोतवाल, प्राजक्ता गांगुर्डे, कविता पवार (अध्यक्ष, बहाईंची स्थानिक आध्यात्मिक सभा, देवळाली) यांच्यासह संगीता मापारी (छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद), शुभदा शुक्ल (उपशिक्षिका, सरस्वती विद्यालय, महात्मा गांधी रोड, नाशिक) यांच्यासह राज्यभरातील असंख्य गुरुजनांचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group