नाशिक :- 4 लाख रुपयांची लाच घेताना उपविभागीय अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (वय 57) असे लाच घेणाऱ्या चाळीसगाव येथील बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी रुरबन' या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता. चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.
या कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याच्या मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात विसपुतेने तक्रारदारकडे 5 लाख रुपये लाच मागितली. तडजोडी अंती 4 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, पो. ना. किरण धुळे, पो. ना. अविनाश पवार, पो.ना.सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.