मुंबई : महाराष्ट्रातील महानंद डेअरीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा झालेला आहे. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे.
महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजी पूर्ण झाली आहे. तसेच मदर डेअरीला राज्य सरकारकडून महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी २५३ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. त्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु झाली. त्यावेळी महानंद मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता.
महानंद डेअरी सर्व सहाकीर संस्थाची शिखर संस्थाची म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून या संस्थेचा हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. या हस्तांतरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्दावरून एकमेकांवर आरोप केले होते.
किती वर्षांसाठी करार झालाय?
महानंद डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करत महानंदा डेरी ताब्यात घेतली. एकूण पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे ही डेअरी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या ताब्यात गेली आहे.