नाशिक (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर आठ दिवस लैंगिक अत्याचार करणार्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि. 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान एका ठिकाणी रात्रपाळीच्या कामासाठी जात होती. त्यावेळी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच राहत असे. याचा फायदा घेऊन आरोपी अमोल लक्ष्मण हिरे (वय 27, रा. आम्रपालीनगर, कॅनॉल रोड, उपनगर) याने तिच्या घरात प्रवेश केला.
त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. ही बाब फिर्यादी महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी अमोल हिरे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दुकळे करीत आहेत.