मोठी बातमी : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, अंतरवालीत जल्लोष
मोठी बातमी : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, अंतरवालीत जल्लोष
img
Dipali Ghadwaje
जालना मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे
मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अंमलबजावणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषणावर बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण स्थगित केलं आहे.

राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी जरांगेची भेट घेऊन त्यांना सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच, मी प्रथमच तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही सरकारला 2 महिन्यांचा अवधी द्यायला हवा, अशी मागणी देसाई यांनी केली होती. त्यानंतर, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला असून आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.

मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून सरकारला 1 महिन्यांचा अवधी दिला आहे. तसेच, पुढील 1 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उभारणार असल्याचेही जरांगे यांनी यावेळी केली.

त्यानंतर, मंत्री शंभुराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडवलं. दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटीत जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group