सिनेस्टाईल पाठलाग करत दोन तरुणांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत
सिनेस्टाईल पाठलाग करत दोन तरुणांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत
img
दैनिक भ्रमर


लासलगाव :- शहरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील २ तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घतले.

त्यांच्या  ताब्यातून तीन गावठी कट्टा, नऊ जिवंत काडतूस आणि शाईन मोटार सायकल असा एकूण एक लाख आडोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली. 

सिनेस्टाईल पाठलाग करत विंचूर तीन पाटी येथून दोन बावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटार सायकलने पहाटे अडीच ते पावणे तीन वाजेच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिफुली येथे पकडले. यात अनिकेत कैलास मळेकर (वय २२, रा. धायरी,पुणे) आणि नामदेव रामभाऊ ठेबे (वय २२) या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांकडे ३ देशी कट्टा आणि ९ जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता, यापूर्वी त्याने शस्त्रे विकली का? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

डीवायएसपी डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिकचा तपास करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group