धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला; चाकूने कापली हाताची बोटे
धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला; चाकूने कापली हाताची बोटे
img
DB
विरार रेल्वे स्थानकावर आज धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पत्नीवर कौटुंबिक वादातून जीवघेणा हल्ला केला. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या हाताची बोटे कापली गेली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेनंतर स्थानकावर रक्ताचा सडा पडला होता. ही घटना रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडली.

पोलिसांच्या  माहितीनुसार शिव शर्मा असे आरोपी पतीचे नाव असून वीरशिला शर्मा असे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून शिव शर्माने वीरशिला हिच्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे विरार स्थानकावर खळबळ उडाली.

वीरशिला शर्मा ही कामावर जात असतांना विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या पादचारी पुलावर शिव शर्माने तिच्यावर चाकूने हल्ला केला. शिव शर्माने वीरशिला हीला रेल्वे ब्रीजवर एकटे गाठून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आधी शिवने तिच्यावर चाकूने वार केला.

त्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. यावेळी वीरशिला पतीचा वार हाताने अडवला. तसेच चाकूचे पाते हातात घट्ट धरुन ठेवले. यामुळे तिच्या हाताची बोटे कापली असून तिचा जीव थोडक्यात वाचला.

रेल्वे स्थानकावरील काही नागरिकांनी वीरशिला हिला संजावनी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तिने विरार पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पती शिव शर्माला अटक केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group