महात्मानगरला हुक्का पार्लरवर छापा
महात्मानगरला हुक्का पार्लरवर छापा
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  महात्मानगरला विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या ताब्यातून हुक्क्याची साधने व तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस नाईक पगार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी हार्दिक अतुल आहिरे (वय 25, रा. समर्थनगर, काठे गल्ली, द्वारका) व कल्पेश सुभाष गांगुर्डे (वय 38, रा. प्रियतमा अपार्टमेंट, स्नेहनगर, म्हसरूळ) हे दोघे काल (दि. 5) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास महात्मानगर येथे विनापरवाना बेकायदा हुक्का पार्लर चालवून प्रतिबंधित हुक्का ग्राहकांना उपलब्ध करून देत हुक्क्याची साधने व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरविले, तर कल्पेश गांगुर्डे हा ग्राहकांना तंबाखूजन्य पदार्थ पुरविताना व सेवन करताना मिळून आला.

या प्रकरणी पोलीस पथकाने हुक्का पार्लरवर छापा टाकून 38 हजार 400 रुपये किमतीचे विविध तंबाखूजन्य पदार्थ असलेली पाकिटे, चिलीम व साहित्य, प्लास्टिक खुर्च्या, टेबल असे साहित्य जप्त करण्यात आले असून, दोघा संशयितांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पगार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group