क्रूरतेचा कळस! जमीनीच्या वादातून सख्ख्या भावाने वृद्ध भावाला डिझेल टाकून जिवंत जाळले
क्रूरतेचा कळस! जमीनीच्या वादातून सख्ख्या भावाने वृद्ध भावाला डिझेल टाकून जिवंत जाळले
img
दैनिक भ्रमर
नाशिकनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या मालकीवरुन शेजारी राहणाऱ्या सख्ख्या भावाने वृद्ध भावावर डिझेल टाकून त्याला पेटवून ठार मारले आहे. या घटनेमुळे तालूक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यात या वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यात हा प्रकार घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील थडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे (वय 80) यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये कचेश्वर नागरे 95 टक्के भाजले होते.  त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान  कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

एका वृत्त संस्थेला दिलेल्या नुसार,  कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी माहिती दिली. गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरु होता

मात्र, माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामासाठी बाहेर गेला होता. याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेलसदृश पदार्थ फेकून तिकडून पळ काढला, असे संजय नागरे यांनी सांगितले. आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघणे महत्वाचे ठरेल.


इतर बातम्या
Join Whatsapp Group