विधान परिषदेत महायुतीला मोठं यश! निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले ,
विधान परिषदेत महायुतीला मोठं यश! निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले , "हा विजय म्हणजे....... "
img
DB
मुंबई : विधान परिषदेतील या विजयाने चांगली सुरुवात झाली आहे. विरोधकांना लोकसभेमध्ये जी सूज आली होती ती सूज आता उतरली आहे. हा विजय विधानसभेतील विजयाची नांदी आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे नऊही उमेदवार निवडून आले आहेत. आम्हाला आमची मते तर मिळालीच; पण महाविकास आघाडीची मतेही आमच्याकडे आली आहेत. एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group