पुराच्या पाण्यातून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून नेली बस; व्हिडिओ व्हायरल
पुराच्या पाण्यातून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून नेली बस; व्हिडिओ व्हायरल
img
दैनिक भ्रमर

स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून एसटी बस चालवल्याची घटना आज समोर आली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळपासून सुधागड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे आंबा नदीने रौद्ररूप धारण केले होते. भेरव गावाजवळ नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. धोकादायक परिस्थितीत एका एसटी बस चालकाने नदीच्या वाहत्या पाण्यातून पुलावरून बस काढली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना झाली नाही. चालकाच्या या बेजबाबदारपणाबाबात त्याला निलंबित करण्यात आले आहे.

प्रवाश्यांचे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून पूराच्या पाण्यात एसटी बस चालवल्याची घटना बुधवारी रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे घडल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group