तटरक्षक दल आणि  रायगड पोलीसांची बचाव मोहीम यशस्वी ; अलिबागच्या समुद्रातून 14 खलाशी एअरलिफ्ट
तटरक्षक दल आणि रायगड पोलीसांची बचाव मोहीम यशस्वी ; अलिबागच्या समुद्रातून 14 खलाशी एअरलिफ्ट
img
Dipali Ghadwaje
अलिबाग समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज काही तांत्रिक कारणाने बंद पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. या जहाजावरील 14 खलाशांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे. तटरक्षक दल व रायगड पोलिसांनी संयुक्तरित्या ही बचाव मोहीम राबवली. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजातील सर्व 14 खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी धरमतर येथून कोळसा घेऊन जेएसडब्ल्यू कंपनीचे जहाज जयगडच्या दिशेने रवाना झाले होते. हे जहाज अलिबाग परिसरात आले असता काहीतरी तांत्रिक कारणामुळे बंद पडले. 

यानंतर समुद्रात हेलकावे खात असल्याने समुद्रात जहाज नांगरून ठेवण्यात आले. मात्र गुरुवारी रात्री जहाजात अडकलेल्या 14 खलाशांच्या सुटकेसाठी शोधमोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. 

समुद्रात उसळत असलेल्या लाटा व जोरदार पावसाच्या सरींमुळे रात्री शोधमोहीम राबविता आली नाही. शुक्रवारी सकाळी मुंबईहून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर अलिबागमध्ये दाखल झाले. यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजात अडकलेल्या खलाशांना जहाजातून समुद्रकिनारी आणण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group