VN Naik Election Update : आणखी 12 निकाल हाती; वाचा कोणते पॅनल आहे पुढे
VN Naik Election Update : आणखी 12 निकाल हाती; वाचा कोणते पॅनल आहे पुढे
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत रविवार  (दि.२८) रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या चार गटांच्या निकालात हेमंत धात्रक आणि तानाजी जायभावे प्रणित प्रगती पॅनलने १३ जागांवर विजय मिळवला. तर कोंडाजी आव्हाड आणि बाळासाहेब सानप प्रणित परिवर्तन पॅनलला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. 

यंदा प्रथमच चार पॅनलची निर्मिती झालेल्या या निवडणुकीत २९ जागांकरिता तब्बल ११८ उमेदवार रिंगणात असल्याने मतदानाची चुरस वाढली होती. बिनविरोध निवडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. त्या नंतर चार पॅनलची निर्मिती करण्यात आली होती, त्यामुळे मतांचे विभाजन हे मोठ्या प्रमाणात होईल हे स्पष्ट झाले होते. 

दरम्यान मतदानाच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले होते. चारही पॅनलच्या नेत्यांकडून लेखी ना हरकत घेतल्यानंतर मतमोजणी जाहीर करण्यात आली. रविवारी (दि.२८) पंचवटी येथील भावबंधन मंगल कार्यालयात सुरू झालेल्या सकाळी ८ वाजता उमेदवारांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याने तब्बल चार तास मतमोजणीला विलंब झाला. बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत पहिला निकाल सव्वा सात वाजता जाहीर झाला. 

येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदांसाठी मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांचा निकाल अद्याप लागायचा असून रात्री उशिरापर्यंत त्यांची मतमोजणी सुरू होती.

विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये देखील प्रगती पॅनलला सर्वाधिक 8 जागा तर परिवर्तन पॅनेल ला 2 जागा मिळाल्या. यामध्ये लक्ष्मणराव पंडितराव जायभावे (2235) हे विजयी झाले तर प्रगती पॅनलचे नामदेव रामचंद्र काकड (2068), नारायण कारभारी काकड (2049), दामोदर नारायण मानकर (2553), बबन दत्तात्रय सानप (2099), अशोक दामोधर नागरे (2106) हे विजयी झाले आहेत.

सिन्नरमधून प्रगती पॅनलचे जयंत आव्हाड (2481), समाधान गायकवाड (2473), हेमंत नाईक (2339) हे तिघे विजयी झाले.
निफाडमधून प्रगतीचे पुंजाहरी काळे (2504), बंडू दराडे (2353), परिवर्तनचे उद्धव कुटे (2336) हे विजयी झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group