"त्या" हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत मोठी अपडेट, पोलिसांना सापडण्याआधीच 'त्याने' महत्त्वाचा पुरावा केला नष्ट?
img
Dipali Ghadwaje
नवी मुंबई : उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली होती. तेव्हापासून पोलीस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , दाऊद शेखला अटक केल्यापासून पोलीस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेखने हे दोन्ही फोन फॉरमॅट केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे. 

पोलिसांनी गुरुवारी दाऊद शेखला यशश्री शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते.  दाऊदने यशश्रीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र, या तपासात दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती.

दाऊदकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. हे फोटो दाखवून तो यशश्रीला ब्लॅकमेल करत होता, असे सांगितले जाते. या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवले होते, अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते. त्यामुळे या तपासात दाऊद आणि यशश्री शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलीस तपासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरु शकला असता.

हेही वाचा >>>>> दुर्दैवी! भरधाव फॉर्च्युनरनं प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू

मात्र, यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊदने स्वत:चा मोबाईल फॉरमॅट केला. तर यशश्रीचा मोबाईल त्याने हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावर टाकून दिला होता. तो मोबाइलही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, यशश्रीचा मोबाइलही दाऊदने फॉरमॅट केला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट झाल्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस तज्ज्ञांची मदत घेऊन दाऊदच्या मोबाईलमधील डेटा पुन्हा मिळवू शकतात का, हेदेखील बघावे लागेल. तर यशश्री शिंदे हिचा मोबाईल दाऊदने सांगितल्यापासून हत्येच्या ठिकाणापासून काही अंतरावरच असेल तो गेला कुठे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group