नाशिक :- नाशिक जिल्ह्यात गेल्या २-३ दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्र्यंबकेश्वरला पावसाने चांगली हजेरी लावल्याने गंगापूर धरण सुमारे ८५ टक्के भरले आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पासून जोरदार पाऊस असून, पावसाची संततधार आजही कायम आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता गंगापूर धरणातून 500 क्यूसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता 1000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
पावसाचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.