धक्कादायक प्रकार ! वडिलांना रिक्षात दिसला मृत लेकीचा फोटो, आणि ...
धक्कादायक प्रकार ! वडिलांना रिक्षात दिसला मृत लेकीचा फोटो, आणि ...
img
दैनिक भ्रमर
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस  आलाय. येथे एका व्यक्तीने घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा बुक केली. तो माणूस ऑटोमध्ये बसताच त्याला तिथे एका मुलीचा फोटो दिसला.

मुलीचा फोटो पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला. त्याने ऑटो चालकाला ही  मुलगी  कोण आहे  विचारले असता, सर ही माझी भाची आहे हे रिक्षा चालकाचे  हे उत्तर ऐकताच  ती व्यक्ती म्हणाली - नाही, तू खोटं बोलत आहेस. ही माझी मुलगी आहे. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांपूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता यांनी एका नर्सिंग होममध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर नर्सिंग होमच्या लोकांनी त्यांना सांगितलं, की त्यांच्या जुळ्या मुलांमध्ये फक्त मुलगा जिवंत आहे. मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी नर्सिंग होममधील लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मात्र, आता अविनाशने ऑटोमध्ये मुलीचा फोटो पाहिल्यावर ती आपली मुलगी असल्याचा दावा केला. नर्सिंग होमच्या लोकांवर मुलीची विक्री केल्याचा आरोप केला आहे.

अविनाश सांगतात की, मुलीचा चेहरा अगदी त्यांच्यासारखाच आहे. मुलीचा भाऊही असाच दिसतो. याप्रकरणी संगीता मौर्या उर्फ ​​संगीता प्रसाद  यांनी सिदगोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दाम्पत्याने डीएनए चाचणीचीही मागणी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.

अविनाशच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं, की - 'मी सिदगोरा मिथिला कॉलनीची रहिवासी आहे. मी 2020 मध्ये गरोदर होते. माझी प्रसूती 7 जानेवारी 2021 रोजी सिदगोरा येथील नर्सिंग होममध्ये झाली. आधी मुलगा झाला, नंतर मुलगी. रुग्णालयातील लोकांनी मुलगी मृत झाल्याचं सांगितलं. आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह मागितला असता त्यांनी तो दिला नाही. आम्हालाही वाटलं की हे खरंच घडलं असेल. यानंतर आम्ही आमच्या मुलासह घरी आलो.'

इतर बातम्या
Join Whatsapp Group