अंबडला 10 भंगार गोदामांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
अंबडला 10 भंगार गोदामांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
img
दैनिक भ्रमर


नाशिक (चंद्रशेखर गोसावी):- शहरातील अंबड औद्योगिक क्षेत्रा जवळ असलेल्या भंगार गोदामांना मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली.

यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी सहा तासांपेक्षा अधिक काळ नाशिकच्या अग्निशमन दलाला झुंज द्यावी लागली.

याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अंबड औद्योगिक क्षेत्राजवळ असलेल्या सातपूर-अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतीला जोडणार्‍या रस्त्यावर दातीर मळा परिसरामध्ये असलेल्या चुंचाळे गावातील दत्तनगर येथे आनंद वाटिका या परिसरात भंगार बाजार आहे. या भंगार बाजारात  वाटिकेच्या शेजारी असणार्‍या गोडाऊनला मध्ररात्री दोन वाजेच्या सुमारास आग लागली.

या आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्याने शेजारी असलेल्या इतर दुकानांनाही आग लागली. या आगीत सुमारे 8 ते 10 दुकानांचे मोठे नुकसान झाले असून, गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन केंद्राला कळविण्यात आली.

सिडको येथील अग्निशमन केंद्राचा बंब आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राचा बंब हे पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचे कार्य सुरू केले, परंतु ही आग मोठी असल्याने या बंबांद्वारे ती विझविणे शक्य नसल्याने महानगरपालिकेच्या पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, मुख्य अग्निशमन केंद्रातून  बंब मागविण्यात आले.

महानगरपालिकेचे अग्निशमन केंद्राचे सुमारे 25 ते 30 कर्मचारी हे आग विझवण्याचे प्रयत्न करीत होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास लागलेली आग सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरूच होती. सुमारे सात तासांपेक्षा अधिक काळ ही आग विझविण्रासाठी लागले. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही असे सांगण्यात येत आहे.

या परिसरात आगीची घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातूनही या ठिकाणी नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आधीच या परिसरामध्ये छोटे रस्ते आहेत आणि त्यानंतर नागरिकांची गर्दी त्यामुळे आग आटोक्रात आणण्रासाठी सुरुवातीला काही काळ अडचण आली. परंतु तातडीने पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी नागरिकांना लांब केले.  दातीर मळा, सातपूर-अंबड लिंक रोड, दत्तनगर या ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मुख्य अग्निशमन अधिकारी बैरागी, सिडकोचे  विभागीय अधिकारी मयूर पाटील, सहाय्रक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड पोलीस ठाण्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सातपूर पोलीस ठाण्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, संदीप पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group