14 हजारांची लाच घेताना पंटर जाळ्यात
14 हजारांची लाच घेताना पंटर जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- 14 हजार रुपयांची लाच घेताना एका खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रितेश पवार (वय 30, रा. पाटण ता शिंदखेडा जि. धुळे) असे लाच घेणाऱ्या पंटरचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार कौटुंबिक जमिनीची वाटणी करावयाची असल्याने खातेफोड होण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, शिंदखेडा येथे विनंती अर्ज सादर केला होता.

त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वेळोवेळी नायब तहसीलदार, शिंदखेडा यांच्याशी भेटून खातेफोड कामी पाठपुरावा सुरू केला होता.  तेव्हा आरोपी खाजगी इसम (पंटर)  यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी यांची ओळख व प्रभाव असल्याचे सांगून त्यांना देण्याकरिता 20,000  रुपये लाचेची मागणी केली.  तडजोडीअंती त्याने 14,000 रुपये घेण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पोना प्रवीण मोरे,पो.ना. संतोष पावरा, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group