'अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच...' शरद पवारांचा टोला, भुजबळांवरही साधला निशाणा म्हणाले....
'अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच...' शरद पवारांचा टोला, भुजबळांवरही साधला निशाणा म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
अकोला :एकीकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची निवडणूक आयोगासमोर परिक्षा सुरू असतानाच राज्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांचाच होता असा आरोप भुजबळांनी केल्यानंतर पवारांनाही त्याला जोरदार प्रत्यूतर दिले आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नचं राहणार अशी तिखट टिकाही शरद पवारांनी केली.

दरम्यान शरद पवार यांनी यावर भाष्य करताना एक प्रकारे अजित पवार यांची खिल्लीच उडवली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असं त्यांनी म्हटलं आहे. अकोला इथं सहकार महर्षी अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमासाठी तसेच सहकार महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.  

"अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या गळ्यात पहिला हार घालणारी मी असेन कारण बहिण म्हणून माझ्या त्याच्यावर जास्त हक्क आहे" असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरही पत्रकारांनी विचारल्यानंतर पवार म्हणाले, "ठीक आहे, पण हे एक स्पप्न आहे. ही काही घडणारी गोष्ट नाही" यावरुन त्यांनी अजित पवारांना टोला लगावत त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्नच राहणार आहे, असं ते म्हणाले.

छगन भुजबळांच्या आरोपांवर उत्तर देताना शरद पवार यांनी "आमच्यातील काही लोकांचा भाजप सोबत जाण्याचा आग्रह होता, मात्र त्यास आमचा विरोध होता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव भुजबळांचाच होता. असे म्हणत छगन भुजबळ यांनीच खोटे बोलत असल्याची कबुली दिली आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच "छगन भुजबळ काहीही बोलतात, त्यांना फार महत्व देवू नका, ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत? मात्र निवडून आल्यावर ते भाजपसोबत जातात. त्याबद्दल काय बोलायचं," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राज्यात आमचं सरकार येईल
अजित पवारांना पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु अशा आशयाचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, आमचा आग्रह हाच असणार आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र राहणार आहोत. राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या सर्वाचं उद्या राज्य यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. जनमानसात आम्ही जो प्रतिसाद पाहतो आहोत. त्याचं जर मतांमध्ये परिवर्तीत झालं तर या तीन पक्षांचं राज्य येऊ शकतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group