Nashik : चुंचाळे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने पुढार्‍यांना नो एंट्री
Nashik : चुंचाळे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने पुढार्‍यांना नो एंट्री
img
दैनिक भ्रमर

सिडको : मराठा समाजाचा आरक्षण प्रकरणात आता नाशिक मध्ये देखील नेत्यांना विरोध होऊ लागला आहे. नाशिक शहरातील चुंचाळे येथे नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंंबा देण्यासाठी नाशिक पश्‍चिम मतदार संघातील सिडको लगत असलेल्या चुंचाळे गाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुढार्‍यांना प्रवेश बंदी असा फलक लावण्यात आला आहे. नाशिक शहर परिसरात पहिला गावबंदीचा फलक लागला आहे. 

मराठा आरक्षणासाठी आजी-माजी आमदार, राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश नाही, असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत सर्वच पक्षांचे सरकार सत्तेत आले; परंतु एकाही पक्षाच्या सरकारकडून मराठा समाजाला न्याय दिला गेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी केल्या. परंतु या घोषणा आणि आश्‍वासनाची पूर्ती एकाही राजकीय पक्षाकडून झाली नाही. यामुळे मराठा समाजास आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने उभारावे लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गावागावात साखळी उपोषण होताना दिसत आहे. या पार्श्‍ववभूमीवर राजकीय पुढार्‍यांना बंदी घालण्याचा निर्णय चुंचाळे गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून याला इतर समाजानेही पाठींबा दर्शवला आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटाच्या माजी आमदाराची गाडी फोडली
https://dainikbhramar.com/news/v/813/big-news-the-car-of-the-former-mla-of-the-thackeray-group-was-broken-into


यांनी लावला फलक
आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पुढार्‍यांना प्रवेश नाही असा निर्णय चुंचाळे गावांतील ग्रामस्थांनी घेतला आहे.

आज सकाळी चुंचाळे गाव येथील मारुती मंदिराजवळ आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पुढार्‍यांना प्रवेश नाही असा फलक रामदास मेदगे, निवृत्ती इंगोले, राकेश सोनवणे, चंद्रकांत मेदगे, विठ्ठल पाचपिंड, भागवत गंगे, किसन गुळवे, हेमंत सोनवणे, राजू बोडके, विजय निसरट, मंगेश दरोडे, राजू बोडके, लोकेश इंगोले, अविनाश संत अर्जुन फरकडे, शिवाजी ढेरंगे, भरत ढेरंगे, समाधान मेदगे, साहेबराव मेदगे, कुणाल मेदगे, खंडू गुळवे, अक्षय सोनवणे, विकास गुळवे, पप्पू भवर, बाळू निसरत यांनी लावला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group