ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक
ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- एस. टी. महामंडळातील वैद्यकीय रजेवर असलेल्या चालकास पुन्हा कामावर जाण्यासाठी सक्षम असल्याचे सटीफिकेट देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच घेताना धानोरा ग्रामीण रुग्णालयातील सफाई कामगार जयेश शंकर तेजी आणि त्याच्या सहकाऱ्यास नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. तेजी हा सफाई कामगार असताना त्याने आपण क्लर्क असल्याचे भासवून ही लाच स्वीकारली होती.

याबाबत माहितीय अशी, की तक्रारदार हे एस. टी. महामंडळ नंदुरबार येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तक्रारदार हे मे 2023 पासून वैद्यकीय रजेवर होते. आता प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर हजर होण्यासाठी तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फॉर ड्युटी सर्टीफिकेटची आवश्यकता होती.

याबाबत चौकशीसाठी तक्रारदार आले असता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे धानोरा येथील सफाई कामगार जयेश शंकर तेजी (वय 40) यांनी तक्रारदार यांना फोन करून व स्वतः जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे क्लर्क असल्याचे भासवून, तसेच त्याचा साथीदार आरोपी खासगी इसम तुकाराम भिला भोई (वय 43, रा. भोई गल्ली, नंदुरबार) हा डॉक्टर असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळवून देतो, असे सांगून, त्या बदल्यात तक्रारदाराकडून तक्रारदाराकडून प्रथमतः 12 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपयांची मागणी केली.

त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या खात्याच्या पथकाने दि. 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या सापळा कारवाईदरम्यान तेजी याने याने तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष 10 हजार रुपये रक्कम स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

सव्वा कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या "या" प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला अटक

नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार अमोल मराठे, देवराम गावित, विजय ठाकरे, पोलीस नाईक संदीप नावाडेकर व मनोज अहिरे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. याबद्दल नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर विभागाचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा पथकाचे अभिनंदन केले.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group