पथदिपावर झेंडे लावताना क्रेनला ट्रकची धडक; भीषण अपघातात 2 ठार तर 4 जखमी
पथदिपावर झेंडे लावताना क्रेनला ट्रकची धडक; भीषण अपघातात 2 ठार तर 4 जखमी
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शिवजयंतीनिमित्त मनमाड - नांदगाव मार्गावरील पथदीपांना क्रेनवर उभे राहून झेंडे लावत असतांना मागून आलेल्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत क्रेन रस्त्यावर उलटा होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रेनला धडक बसल्याने ही क्रेन रस्त्याला आडवी गेलेल्या अतिदाबाच्या वायरवर जाऊन आदळल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून सदर अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे जयंती निमित्त मनमाड - नांदगाव मार्गावरील पथदीपांना भगवे झेंडे लावण्याचे काम सुरू होते. पथदीप उंच असल्यामुळे क्रेनद्वारे झेंडे लावले जात होते. एम एच 41 ए झेड 0647 क्रमांकाच्या क्रेनवर पाच जण झेंडे लावण्याचे काम करत होते. झेंडे लावत असतांना मागून येणारा एम एच 04 ई एल 4820  या क्रमांकाची ट्रक भरधाव वेगाने येत क्रेनला धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की क्रेन रस्त्यावर आडव्या गेलेल्या अतिदाबाच्या विजेच्या वायरवर जाऊन आदळल्यामुळे जो विजेचा करंट बसला त्यामुळे क्रेन उलटा होऊन खांबावर आदळला. त्यामुळे क्रेनवर असलेले पाच जण आणि क्रेन चालक अशा सहा जणांमधून शहरातील चार्लस इंद्री फ्रान्सिस आणि अजय बाळू पवार हे दोघे जण जागीच ठार झाले आहेत.

त्यातील ब्रोनो फ्रान्सिस, सचिन किशोर हाटकर, हायड्रा क्रेन चालक रणजीत कुमार आणि ट्रक चालक प्रभाकर आनंद ताजणे असे चार जण गंभीर जखमी असल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.

याप्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group