नाशिकच्या
नाशिकच्या "या" मंत्र्याला न्यायालयाने ठोठावली 2 वर्षांची शिक्षा
img
दैनिक भ्रमर
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दुसऱ्या आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 1995 साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी आज कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. यात त्यांनी माणिकराव कोकाटे यांंच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनुसार भादंवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशी माहिती शासनाला दिली होती. यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका देण्यात आली. पण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. फक्त माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group