रिक्षावर ट्रक उलटून तीन जणांचा मृत्यू; चार जखमी
रिक्षावर ट्रक उलटून तीन जणांचा मृत्यू; चार जखमी
img
दैनिक भ्रमर

मालेगाव :- मालेगावच्या दरेगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक रिक्षावर पलटी होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात ट्रकखाली रिक्षा दाबली गेल्यामुळे त्यातील रिक्षा चालकासह दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन विद्यार्थी आणि ट्रक मधील दोन असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षा आणि ट्रकचे मोठया प्रमाणावर नुकसान होऊन रिक्षाचा अक्षरशः चुरा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले व जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

पोलीसही घटनास्थळी दाखल झाले याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group